नवी दिल्ली- राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ आज राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भेटी दरम्यान, राज्यातला संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमित शहांशी चर्चा करणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचा नव्याने सहभाग होणार आहे. याबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच, उद्या मुंबईत आणि नंतर दिल्लीत देखील यासंदर्भात काही बैठका होणार आहेत.