भाजपचे नागपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सोबत होत्या. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी भाजपने शुक्रवारी सकाळी नागपूरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.
Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis files his nomination from Nagpur South West. Union Minister Nitin Gadkari also present. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/T15ZjEmlxl
— ANI (@ANI) October 4, 2019
नागपूरमधील संविधान चौकातून रॅलीकाढून देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. नागपूरमध्ये सर्वांचे लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकडे लागले होते.
Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and his wife Amruta sought blessings of Union Minister Nitin Gadkari & his wife Kanchan, earlier today, before Fadnavis left to file his nomination from Nagpur South West. #Maharashtra pic.twitter.com/JnWhANcJB0
— ANI (@ANI) October 4, 2019
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सपत्नीक नितीन गडकरी यांच्या घरी गेले. यावेळी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे यावेळी औक्षण केले. त्यानंतर संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कॉंग्रेस आघाडीने आशिष देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.