नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भगवंत मान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे मुख्यमंत्र्यांची तपासणी करण्यात आली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना संसर्ग झाल्याचे सांगितले.
दरम्यान, बुधवारी भगवंत मान यांनी अमृतसरजवळ सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयितांच्या हत्येनंतर राज्यातील गुंडांवर यशस्वी कारवाई केल्याबद्दल पोलीस आणि गुंडविरोधी टास्क फोर्सचे अभिनंदन केले होते. जगरूप सिंग रूपा आणि मनप्रीत सिंग अशी ठार झालेल्या गुंडांची नावे असून त्यांच्याकडून चकमकीनंतर ak-47 आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले.
मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात भगवंत मान म्हणाले की, ‘राज्यातील गुंड आणि समाजकंटकांविरुद्ध राज्य सरकारने निर्णायक युद्ध सुरू केले आहे. अमृतसरमधील ऑपरेशन ही त्याचीच एक कडी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, 21 जुलै रोजी मान यांनी पारंपारिक शीख (आनंद कारज) विवाह सोहळ्यात डॉ. गुरप्रीत कौरसोबत लग्न केले.’