नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्यादरम्यान जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले होते. विधानसभा निवडणुकांनंतर प्रथमच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींकडे केंद्राकडून पश्चिम बंगालला थकीत निधी मिळावा तसेच करोना लसी तसेच औषधे अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, राज्याच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावावा या मागण्या केल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, बॅनर्जी या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याही भेट घेतली. बॅनर्जी या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच सपा अध्यक्ष अखिलेश यादव व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही बॅनर्जी भेट घेतील.
It was a courtesy meeting with PM today. During the meeting, I raised the issue of COVID & need for more vaccines & medicines in the state. I also raised the pending issue of the change of name of the state. On this issue, he said, “He will see.”: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/XRXc3mmzJa
— ANI (@ANI) July 27, 2021