मुख्यमंत्र्यानी केला राज ठाकरेंवर हल्लाबोल

नाशिक – लोकसभा निवडणूक यावेळेस राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभेत राज ठाकरे आपल्या आक्रमक भाषणातून अमित शाह आणि नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत होते. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये प्रचारसभेदरम्यान आघाडी आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार होते, याचा विसर त्यांना पडला. या सरकारने त्यांच्या विनंतीवरून पैसा पुरविला, त्यामुळे मनसेचे इंजिन नाशकात सुरळीत चालू शकले, असा खुलासाही फडणवीस यांनी सभेत बोलताना केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.