लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज माफी वरून राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर साधल शरसंधान

कोल्हापूर / प्रतिनिधी – महापुरामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभा केलेली पीक महापुरामुळे पूर्णतः झोपली आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी 23 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये गोलमाल केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच खेड्यापाड्यांमध्ये एक म्हण आहे. लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक पीक पुराच्या पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. हाताशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे. एकीकडं कर्ज काढून पिकाची लागवड केली. तर दुसरीकडं हाताशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचे चित्र आहे.

अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना शासन शेतकऱ्यांची फसवणूक करते की काय अशी शंका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. 23 ऑगस्टच्या शासन निर्णयामध्ये 2019 मध्ये आलेल्या महापुराने बाधित असलेल्या पीक कर्ज माफ केल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी घोषणा केली त्याच वेळेस यामध्ये गोलमाल असल्याचं मला निदर्शनास आलं होतं असं शेट्टी यांनी म्हटले आहे.

खेड्यापाड्यांमध्ये म्हणून आहे लबाड घराचं जेवणाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं यामधून सिद्ध होतं. अस सांगत शेट्टी म्हणाले या शासन निर्णयानुसार काटेकोरपणाने अंमलबजावणी करायचं झालं तर एक एप्रिल ते 14 ऑगस्ट या कालावधीत ज्यांनी कर्ज उचलल आहे हे तेच हे कर्ज माफी पात्र होईल असे म्हटले आहे.

या महापुरामुळे केळी, ऊस आणि फळबागा भाजीपाला यासाठी गेल्या आर्थिक वर्षात कर्ज काढून उभी केलेली ही पीक आहेत आणि केवळ 2018 मध्ये कर्ज घेतलं म्हणून माफी पात्र ठरत नसतील तर याचा अर्थ फक्त 20 टक्के पूर्ण बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे बाकीचे वाऱ्यावर सोडणार आहेत म्हणजे हे सरकार कसं फसवलं याचे हे उत्तम उदाहरण असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)