नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी आज वैय्यक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे वृत्त असून ते पसरताच विरोधी पक्षांत खसपस पिकली परंतु कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्रमुख नेतेमंडळीकडून देण्यात आली नाही.
पी के सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या तुकडीचे अधिकारी होते.२०१९ साली पंतप्रधानांच्या मुख्य सल्ल्लागारपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधीही पंतप्रधान कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणूनही काम केलेलं होते.
उर्जा खात्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभारही त्यांनी भूषविला आहे. विशेष म्हणजे चार वर्ष मंत्रीमंडळ सचिव म्हणूनही काम केलंलं आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवलेल्या सिन्हा ह्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात पदव्युत्तर परीक्षा देखील पास केलेली आहे. त्यांच्या सेवाकाळात लोक प्रशासनात पदव्युत्तर पदविका आणि सामाजिक विज्ञान विषयात एम.फिल देखील पूर्ण केलेलं आहे. ह्याशिवाय त्यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये विविध महत्वाची पदे भूषविली आहेत.