चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात मोठा झटका बसला आहे. कोर्टाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. आता त्यांना आणखी 14 दिवस तिहार तुरुंगात रहावे लागणार आहे.

चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर 23 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होईल. ते 5 सप्टेंबरपासून तिहार कारागृहात आहेत. त्यांच्यावर अर्थमंत्री असताना परकीय गुंतवणूकीला मान्यता देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरमलाही अटक केली असून सध्या तो जामिनावर सुटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)