चिदंबरम यांच्या जामीनाला “ईडी’कडून हायकोर्टात आव्हान

नवी दिल्ली – एअरसेल-मॅक्‍सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्याचा मुलगा कार्ती यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. “आयएनएक्‍स मीडिया’ भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी अटक केल्यानंतर चिदंबरम तुरूंगातच आहेत.

विशेष न्यायालयाने 5 सप्टेंबरला चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांना “एअरसेल मॅक्‍सिस’ प्रकरणात आरोपी बनवण्यापूर्वी “सीबीआय’ आणि “ईडी’ने दाखल केलेल्या खटल्यांमध्ये विशेष कोर्टाने 2 फेब्रुवारी 2017 रोजी द्रमुकचे नेते आणि माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन, त्याचा भाऊ कलानिथी मारन आणि इतरांची सुटका केली होती.

त्यानंतर, दोन्ही एजन्सींनी पूरवणी आरोपपत्रात चिदंबरम यांचे नाव समाविष्ट केले होते. चिदंबरम अर्थमंत्री असताना एअरसेल-मॅक्‍सिसला 3,500 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणूकीची मंजुरी देण्याततील अनियमिततातेशी संबंधित हे प्रकरण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here