चिदंबरम यांचा सचिन पायलट यांना सबुरीचा सल्ला!

नवी दिल्ली: ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी राजस्थानातील बंडखोर कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी फोन करून सबुरीचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी स्वत:च ही माहिती दिली.
ते म्हणाले की, मी स्वत: काल पायलट यांच्याशी बोललो. त्यांनी पक्षात परत यावे अशी जाहीर सूचना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीरपणे केली आहे. सर्व प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही त्यांना कॉंग्रेसने दिली आहे.
या संधीचा लाभ पायलट यांनी घ्यावा, असे मी त्यांना सांगितले. असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. काल पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अन्यही अनेक ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी सचिन पायलट यांची समजूत काढली आहे. त्यांच्याशी सातत्याने फोन वरून संपर्क केला जात आहे; पण अजून पायलट यांनी त्याला धूप घातलेली नाही. काल पायलट यांनी कॉंग्रेसचे
राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांच्याशीही फोन वरून चर्चा केली.





