नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मिळण्याची विनंती माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या विनंतीवर चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा. तसेच जर जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार जेलमध्ये न पाठवता घरीच स्थानबद्ध करण्यात यावे. अशे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला देण्यात आले आहेत
Supreme Court asks Senior Congress leader P. Chidambaram to approach the concerned court for interim protection. Also orders that he be not sent to Tihar Jail and if trial court rejects his bail plea, his CBI custody will be extended till Thursday. pic.twitter.com/FYScQ4pvKB
— ANI (@ANI) September 2, 2019
न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की चिदंबरम ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केलं जाऊ शकतं.
दरम्यान चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.त्यामुळे चिदंबरम यांच्याकडून अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध दाखल याचिकेवर आपण आपलं उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत.