तिहार तुरूंगात कार्ती चिदंबरम यांचीही उपस्थिती
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यातील आरोपी आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांची आज कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. आयएनएक्स प्रकरणात न्यायालयाने चिदंबरम यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
Sources: Congress Interim President Sonia Gandhi and Former PM Dr Manmohan Singh to visit Delhi’s Tihar Jail today to meet P Chidambaram. (file pics) pic.twitter.com/yytkAD39zL
— ANI (@ANI) September 23, 2019
आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी त्यांचा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी गुरुवारी संपला होता. त्यानंतर त्यांचे वकील सिब्बल यांनी चिदंबरम यांना एम्समध्ये नियमित वैद्यकीय तपासणी आणि तिहारमध्ये त्यांच्यासाठी पुरेसे आहार पूरक आहार पुरवण्याचे आवाहन केले होते. तसेच सिब्बल यांनी, चिदंबरम यांना एम्समध्ये चौकशी करण्याची परवानगी देण्यात यावी. यावर न्यायालयाने तुरूंग प्रशासनाने कोणत्याही कैद्याला जी वागणूक दिली जाते तीच वागणूक कायद्याच्या चौकटीत राहून चिदंबरम यांना सुविधा पुरवण्यात यावी असे सांगितले होते.