नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणातील आरोपी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. यामुळे अखेर ते 106 दिवसानंतर तुरुंगाबाहेर येणार आहेत.
चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने चिदंबरम यांना २ लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाच्या पवानगीशिवाय चिदंबरम परदेशात जाऊ शकत नाही. याप्रकरणी चिदंबरम यांना माध्यमांना मुलाखती अथवा निवेदन देऊ शकत नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Supreme Court directs P Chidambaram to furnish a bail bond of Rs 2 lakhs along with 2 sureties of the same amount. SC also says Chidambaram can not travel abroad without the Court’s permission. https://t.co/JTs5nGBpJd
— ANI (@ANI) December 4, 2019
Supreme Court says P Chidambaram should not temper with the evidence and not influence the witnesses. He should also not give press interviews or make make public statements in connection with this case. https://t.co/JTs5nGBpJd
— ANI (@ANI) December 4, 2019
दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला. पण त्याआधीच या प्रकरणातील पैशांच्या व्यवहारावरून सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही ईडीच्या प्रकरणात त्यांना अटकेत राहावे लागले होते. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.