नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक होवून ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने चिदंबरम यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अटकेची बातमी कळताच ही चांगली बातमी असल्याचे तिने म्हटले आहे. इंद्राणी मुखर्जी ही शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.
Indrani Mukerjea, who turned approver in INX Media case, on being asked about arrest of P Chidambaram: It’s good news that P Chidambaram has been arrested. (file pic) pic.twitter.com/McwrbOUZTP
— ANI (@ANI) August 29, 2019
इंद्राणी मुखर्जी ही आयएनएक्स मीडिया प्रकरणात सहआरोपी आहे. तिच्या एका साक्षीमुळे चिदंबरम यांना अटक करण्यात आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान तिने पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम या पिता-पुत्रांची नावे घेतली होती. तसेच या प्रकरणात आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचारात कार्ती यांचा सहभाग असल्याचे इंद्राणीने तपासादरम्यान सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणात पी. चिदंबरम यांना अटक झाल्याचे कळताच ही चांगली बातमी आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.