मला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे

– चिदंबरम यांचा वाढदिवस तिहारमध्येच

नवी दिल्ली- आपल्याला आज 74 वर्षांचे तरुण झाल्यासारखे वाटत असल्याचे कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांचा 74 वा वाढदिवस आज झाला. या निमित्ताने मिळालेल्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आपल्या कुटुंबीयांच्या माध्यमातून चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या दिवशीही ते अर्थकारणाबाबत बोलत असल्याचे चिदंबरम यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

चिदंबरम यांना कॉंग्रेस पक्षातील सहकारी आणि पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याकडून चिदंबरम यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या शुभेच्छांमुळे आपले मनोधैर्य उंचावले असून आपल्याला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटत असल्याचे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे. एका अन्य ट्‌विटमध्ये चिदंबरम यांनी सर्वांच्या शुभेच्छा कुटुंबीयांच्या माध्यमातून मिळाल्या असून कुटुंबीयांनीच आपल्यावतीने सर्वांना ट्‌विटरवर धन्यवाद दिल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आजच्या दिवशी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचे विचार आपल्या मनात येत आहेत. ऑगस्टमध्ये निर्यात -6.05 टक्के होती. वर्षभरात 20 टक्के निर्यात केल्याशिवाय कोणत्याही देशाने 8 टक्के विकासदर गाठलेला नाही, असेही चिदंबरम यांनी आणखी एका ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

चिदंबरम सध्या अग्निपरीक्षेला सामोरे जात आहेत आणि लवकरच त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल. आपण त्यांच्या समवेत 1986 पासून काम केले आहे. त्यांच्याबरोबर काम करणे म्हणजे सन्मान होता, असे कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. तर सूडाचे राजकारण यशस्वी होणार नाही, असे के.सी.वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. महिला कॉंग्रेसने चिदंबरम यांना टेनिसपटू “रफेल नदाल’ची उपमा दिली आहे. तर चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना शुभेच्छा देताना “तुम्ही 74 वर्षांचे झालात. तुम्हाला कोणीही “56′ रोखू शकणारा नाही.’ असे म्हणून पंतप्रधानांवर उपहासात्मक टीका केली.

अर्थमंत्री असताना “आयएनएक्‍स मिडीया’ प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली चिदंबरम यांना तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.