दुष्काळामुळे पोल्ट्री व्यवसायात घट
मंचर – सध्या तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे बहुतांशी पोल्टी फार्म पाण्याअभावी बंद पडले आहेत. सध्या लग्नसोहळे, वाढदिवस, पार्ट्यामुळे बॉयलर कोंबडीला मागणी वाढली आहे; पण चिकनचे दरही वाढले आहेत.
मंचर आणि परिसरात पाणीटंचाईमुळे अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद आहेत. ग्राहकांची चिकनला असणारी मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ बसत नसल्याने चिकनचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारामध्ये बॉयलर कोंबडीचा तुटवडा असल्यामुळे लिफ्टिंग रेटमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
किरकोळ विक्री करणारे व्यावसायिक किलोला 160 ते 170 रुपये भावाने बॉयलर कोंबडीचे चिकन विकत असल्याचे दिसून येत आहे. बॉयलर कोंबडीच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाल्याने गोरगरिबांच्या आवाक्यातील चिकन भाव खाताना दिसत आहे.