विधिमंडळाच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई- सद्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनासाठी येणारे आमदार, अधिकारी तसेच इतर सर्वसामान्यांची भूक भागवण्यासाठी विधिमंडळाच्या आवारात कॅंटीन आहे. मात्र, ही कॅंटीन सध्या चर्चेत आली आहे. या कॅंटीनमध्ये एका सरकारी अधिका-याला मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेचे पडसाद सोशल मिडीयावर उमटताच याप्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचे गांभीर्य पाहून याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे कॅंटिनमधील पदार्थ हे योग्य मानांकनानुसार बनविले जातात की नाहीत याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.

विधानसभेत या प्रकरणाचे संतप्त पडसाद उमटले. कॅंटिनमधील उसळीत चिकन सापडले असून हा संबंधित व्यक्तीच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारे निष्काळजीपणा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करण्यात येतील. त्याचप्रमाणे कॅंटिनमधील स्वच्छता तसेच योग्य मानांकनांनुसार अन्नाची निर्मिती होते की नाही हे पाहिले जाईल. तसेच संबंधितांना कडक शब्दांत समज दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

जेवणात शेण सापडले

नागपूर मेडिकल कॉलेजमधील उमेश पवार या रुग्णाच्या जेवणामध्ये शेण सापडले. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तिवर निलंबनाची कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे सर्व रुग्णालयांतील रुग्णांना दिले जाणारे अन्न हे योग्य मानांकनानुसार दिले जाते का याचीही तपासणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here