टाकळी हाजी – चांडोह येथे ऋषिकेश बाळशिराम बरकले यांची गोठ्यातील दीड वर्षांची कालवड बिबट्याने फस्त केली. ही घटना बुधवारी (दि. 17) रात्री घडली. त्यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फाकटे येथे संतोष ज्ञानदेव पाटे यांची मेंढी बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे.
परिसरात नेहमीच या घटना घडत असून वनविभागाने शेतकऱ्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी, अशी मागणी देखरेख संघाचे संचालक संपतर पानमंद यांनी केली आहे. या घटनेचा पंचनामा केला असल्याचे वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी केला तर शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.