आषाढातही कोंबड्यांत “घसरण’

मंचर – आषाढ महिन्यात गावरान कोंबड्यांना चांगली मागणी असली तरी ब्रॉयलर कोंबड्यांच्या चिकनच्या दरात घट झाली आहे. आषाढ महिन्याच्या सुरुवातीला ब्रॉयलर कोंबडीच्या चिकनची 180 ते 200 रुपये किलो दराने विक्री होत होती. सध्या यामध्ये किलोमागे 40 ते 50 रुपयांची घट झाली आहे. तसेच गावरान कोंबडा सध्या 600 ते 700 रुपयांना विकला जात असून कोंबडीला 350 ते 400 रुपये बाजारभाव मिळत आहे.

आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणावर बॉयलर कोंबडीच्या चिकनची विक्री होत असते. शेतकरी वर्गाने व बॉयलर माल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आषाढ महिना डोळ्यापुढे ठेवून मोठ्या प्रमाणात मालाची मुबलकता केल्याने दरात घट झाली आहे. सद्यस्थितीत बॉयलर कोंबडीच्या एक किलोचा लिफ्टिंग रेट 63 ते 64 रुपये आहे. होलसेल दरात व्यवसायिकांना पुरवठा करणारे व्यवसायिक एका किलोला 69 ते 70 रुपये दर घेत आहेत. घाऊक बाजारातही मोठ्या प्रमाणात मालाची मुबलकता असल्याने किरकोळ विक्रेते एका किलोला 140 ते 150 रुपये दर आकारत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी दिली.आषाढ महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ग्राहक नामांकित हॉटेलमध्ये जाऊन चिकनची चव चाखत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चव चाखण्याची चिकन शौकिनांची मौज होत असते, असे कळंब येथील हॉटेल तिरंगा गार्डनचे मालक नितीन भालेराव तसेच जुन्नर येथील प्लॅटिनम हॉटेलचे व्यवस्थापक उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, उद्योजक सचिन भालेराव, सुनील भालेराव, भरत भालेराव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)