पुणे – मासळी, मटण, चिकन आणि अंडीला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकनच्या भावात किलोमागे 10 रुपयांनी, तर गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावात शेकड्यामागे 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मासळीच्या भावात 5 ते 10 टक्क्यांनी घट झाली आहे. मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी ठाकुर परदेशी, रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि.14) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 15 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो तर नदीच्या मासळीची 1 ते 1.5 टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मागील आठवड्यात मासळीला मागणी कमी होती. मात्र, शनिवारी आणि रविवारी जास्त मागणी असल्याचे ते म्हणाले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो चे भाव) :
पापलेट : कापरी : 1400 मोठे 1200-1300, मध्यम : 1000, लहान 700, भिला : 600, हलवा : 480, सुरमई : 550-600, रावस : लहान 600, मोठा : 800, घोळ : 600, भिंग : 400, करली : 280-320, करंदी : सोललेली 400-440, पाला : लहान 800, वाम : लहान 600, मोठी 900, ओले बोंबील : 160-240, कोळंबी ः लहान 360, मोठी 480, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 800, लॉबस्टर : 1200, मोरी : 280-320, मांदेली : 120, राणीमासा : 200, खेकडे : 240, चिंबोऱ्या : 600.
खाडीची मासळी : सौंदाळे : 280, खापी : 240, नगली : लहान 360, मोठी 700, तांबोशी : 400, पालू : 280, लेपा : लहान 140 मोठे 240, शेवटे : 240 बांगडा : लहान 180 , मोठे 220-280, पेडवी : 100, बेळुंजी : 180-200 तिसऱ्या : 240, खुबे : 120, तारली : 160.
नदीची मासळी : रहू :160 कतला :160-200, मरळ : 480, शिवडा : 280, खवली : 240, आम्ळी :200, खेकडे : 240,वाम : 600.
चिकन : चिकन : 170, लेगपीस : 210 जिवंत कोंबडी : 130, बोनलेस : 270.
अंडी : गावरान : शेकडा : 860 डझन : 120 प्रति नग : 10, इंग्लिश : शेकडा : 465 डझन : 60 प्रतिनग : 5
मटण : बोकडाचे : 660, बोल्हाईचे : 660 खिमा : 660, कलेजी : 700.