पुणे – मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मासळी आणि मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर, थंडी पडू लागल्याने चिकन आणि अंडीला मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात चिकनच्या भावात किलोमागे 20 रुपयांनी, गावरान आणि इंग्लिश अंडीच्या भवात शेकड्यामागे 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली.
रत्नागिरी किनारपट्टीसह गुजरात, कर्नाटक, हावडा, ओरीसा आदी ठिकाणाहून मासळींची आवक होत आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि.15 ) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 12 ते 13 टन, खाडीची सुमारे 500 ते 600 किलो तर नदीच्या मासळीची 1 ते दीड टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 12 ते 15 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : 1300, मोठे 900-1000, मध्यम : 800, लहान 600, भिला : 440-480, हलवा : 360-400, सुरमई : 360-400, रावस : लहान 440 मोठा : 750, घोळ : 550, भिंग : 360, करली : 240-280, करंदी : सोललेली 400, पाला : लहान 800, मोठे 1000-1200, वाम : 600, ओले बोंबील : 120-160, कोळंबी ः लहान 280-320, मध्यम 400-440 मोठे440-520, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 700, लॉबस्टर : 1000, मोरी : 280, मांदेली : 120-140, राणीमासा : 200-240 खेकडे : 280, चिंबोऱ्या : 400-440. खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी :280, नगली : लहान 320, मोठी 700, तांबोशी : लहान 240 मोठे 480, पालू : 280, लेपा : 160, शेवटे : 280, बांगडा : लहान 240 , मोठे 280, पेडवी : 100, बेळुंजी : 160, तिसऱ्या : 280, खुबे : 140, तारली : 180, नदीची मासळी : रहू : 160, कतला : 160, मरळ : 480 शिवडा : 240, खवली : 280, आम्ळी : 140, खेकडे :200 वाम : 600
- चिकन : चिकन : 200, लेगपीस : 240 जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320.
- अंडी : गावरान : शेकडा : 840 डझन : 108 प्रति नग :9
- इंग्लिश : शेकडा : 520 डझन : 66 प्रतिनग : 6.
- मटण : बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.