मिशेलची चौकशी करण्याची सीबीआयला परवानगी

ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणी अटकेत आहे

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयला तिहार कारागृहात दलाल ख्रिस्तियन मिशेलची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. सीबीआयने ख्रिश्‍चियन मिशेलची चौकशी करण्याच्या परवानगीसाठी दिल्लीच्या एका न्यायालयात धाव घेतली होती.

विशेष न्या. अरविंद कुमार यांनी मिशेलला 20 सप्टेंबरपर्यंत या अर्जावर उत्तर मागितले होते. सीबीआयने आपल्या याचिकेत चौकशीसाठी मिशेलचे हस्ताक्षर आणि लिखाणाचे नमुनेही मागितले होते. सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते की, मिशेलकडून आणखी काही दस्तऐवजांसह चौकशीची गरज असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, नुकताच न्यायालयाने मिशेलला जामीन देण्यास नकार दिला होता. दुबईहून प्रत्यार्पण केल्यापासून मिशेलला ईडीने मागील वर्षी 22 डिसेंबरला अटक केली होती. यावर्षी 5 जानेवरीला ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात त्याला न्यायालयानी कोठडीत पाठवण्यात आले. घोटाळ्याप्रकरणी दाखल असलेल्या दुसऱ्या एक प्रकरणातही त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मिशेल हा सक्‍तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीत समोर आलेल्या तीन दलांलापैकी एक आहे. इतर दोन दलाल गुईदो हेशके आणि कार्लो गेरोसा हे आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×