Chhota Rajan Acquitted | गँगस्टर छोटा राजनला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे. सध्या तिहार तुरूंगात असलेल्या छोटा राजनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातंर्गत (MCOCA) विशेष न्यायधीश ए. एम. पाटील यांनी राजनची प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. ‘जर त्याची इतर कोणत्याही प्रकरणात गरज नसेल तर त्याची तात्काळ मुक्तता करावी’, असा निकाल कोर्टाने दिला. मात्र पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राजनला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
17 मे 2011 रोजी केली होती हत्या
17 मे 2011 रोजी दक्षिण मुंबईत आरिफ अबुनाकर सय्यद नावाच्या व्यक्तीवर दोन आरोपींनी गोळीबार केला होता. आरिफ सय्यद हा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रायव्हर होता. या प्रकरणात छोटा राजनवर खुनाचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या छोटा राजन याच्या इशार्यावरून करण्यात आली होती. Chhota Rajan Acquitted |
ज्योतिर्मय डे खून प्रकरणात तुरुंगातच
दरम्यान, राजनवर भारतीय दंड संहिता आणि मकोका, शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत खून आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या प्रकरणात राजन हा तुरुंगातच राहणार आहे. याशिवाय छोटा राजनवर इतर अनेक गुन्ह्यात खटले दाखल आहेत. Chhota Rajan Acquitted |
हेही वाचा :
नागपूरमधील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात; पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती