Chhaya Kadam And Vikrant Massey | मराठमोळी अभिनेत्री छाया कदम सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अलीकडे ‘कान्स’मधील तिच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. नुकतीच तिची भेट बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत झाली. या भेटीदरम्यानचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
छाया कदमने शेअर केलेल्या या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आताच्या पिढीतला एक कसदार-दर्जेदार नायक आणि ’12th fail’ मधून माझ्यासारख्या कित्येकांना पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे आत्मिक बळ देणारा विक्रांत जेव्हा आपल्याला मिठी मारून आपल्या कामाचे तोंडभरून कौतुक करतो, तेव्हा वाटत राहते की आपण असेच फुलपाखरासारखे सगळ्यांना रंग आणि आनंद देत जगत राहावे. थॅंक्यू सो मच विक्रांत…!” अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. या व्हिडीओ छाया आणि विक्रांत एकमेकांना मिठी मारतात आणि संवाद साधताना दिसत आहे.
View this post on Instagram
छाया कदमच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच तिच्या ‘ऑल वी इमॅजन अॅज लाईट’ या सिनेमाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही स्क्रीनिंग झालं. यासाठी तिने खास लुकमध्ये कान्समध्ये हजेरी लावली होती. याशिवाय तिने ‘मडगाव एक्सप्रेस’, ‘सैराट’, ‘न्यूड’ आणि ‘लापता लेडीज’ चित्रपटातही काम केले आहे.
हेही वाचा: