“छावा वाईट सिनेमा”, चित्रपटात काम केल्यानंतर आस्ताद काळेनी स्पष्ट केली भूमिका

Aastad Kale | बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दोन महिन्यानंतरही या चित्रपटाची क्रेझ अद्यापही कायम आहे. एकीकडे हा चित्रपट सुपरहिट ठरलेला असताना ‘छावा’ सिनेमाबाबत अभिनेता आस्ताद काळेने काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
विशेष म्हणजे, या चित्रपटात आस्तादने स्वतःही भूमिका साकारली आहे. यात त्याने सूर्याची भूमिका केली होती. तरीही त्याने या चित्रपटावर टीका केली आहे. रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी ‘छावा’ या सिनेमावर अभिनेता आस्ताद काळेने आक्षेप घेत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
आस्तादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘औरंगजेबाचे वय आणि आजारपण बघतात तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायेत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?’ Aastad Kale |
त्याने आणखी एका पोस्टमध्ये लिहलय की, ‘मी आता खरं बोलणार आहे… छावा. वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरीप्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.’ आणखी एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे?’ आस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेन्ट केल्या होत्या. याप्रकरणी काहीजण त्याला समर्थन देत आहेत. तर काहीजण त्याच्यावर टीकाही करत आहेत. Aastad Kale |
त्याने शेवटी लिहिलं की, “जे सत्य आहे, ते सांगणं गरजेचं आहे, मग ते कुणालाही त्रासदायक का ठरू नये.” या सडेतोड भूमिकेमुळे आस्ताद काळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या पोस्टवर टीका होण्यास सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने त्याने ह्या सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. मात्र या पोस्टचे काही स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
छावा सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या सिनेमाने जगभरात ८०० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दिनेश विजान यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे.
हेही वाचा:





