छत्तीसगड : नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक ; एक जवान शहीद

रायपुर – छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील केशकुतुल परिसरात आज नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सध्या जखमी जवानांची प्रकृती गंभीर आहे. तर नेमके किती नक्षलवादी या चकमकीत ठार झाले याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.