रायपुर – छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत शनिवारी एक नक्षलवादी ठार झाला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला सूरनार आणि तेताम गावांच्या दरम्यान असलेल्या एका जंगलात ही चकमक झाली. त्यात हा नक्षलवादी ठार झाला.
मुचाकी मसा असे त्याचे नाव आहे. त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले आले होते. जनमिलिटीया या नक्षलवादी गटाचा तो कमांडर होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी गेले अनेक दिवस पोलिस प्रयत्नशील होते, पण तो पोलिसांना गुंगारा देण्यात आत्तापर्यंत यशस्वी झाला होता.
त्यामुळे त्याला पकडण्यासाठी हे बक्षिस लावले गेले होते. चकमकीच्या ठिकाणी त्याचे अन्यही साथीदार उपस्थित होते पण तो ठार झाल्याचे समजल्यानंतर साथीदार त्याचा मृतदेह तेथेच टाकून पळून गेले.