रायपूर – छत्तीसगड सरकारने यंदा विक्रमी म्हणजे 84.44 लाख मेट्रिक टन इतकी विक्रमी तांदूळ खरेदी केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील खरेदीसाठीचे नऊ दिवस अद्याप शिल्लक आहेत. त्याच्या आतच ही विक्रमी तांदूळ खरेदी झाली असून उर्वरित काळातही आणखी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.
31 जानेवारीपर्यंत ही सरकारी खरेदी 90 लाख मेट्रिक टनापर्यंत जाण्याची शक्यता राज्य सरकारच्या सूत्रांनी वर्तवली आहे. ही खरेदी एमएसपीच्या दराने सहकारी संस्थांमार्फत केली जाते. या आधी सन 2018-19 या वर्षात 80.83 लाख मेट्रिक टन खरेदी झाली होती तर सन 2019-20 या वर्षात हे प्रमाण 83.94 लाख मेट्रिक टनावर गेले होते. यंदा सरकारने 21 लाख 53 हजार शेतकऱ्यांकडून ही खरेदी केली आहे.