छत्रपती उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई – भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दिल्लीत स्वपक्षातील नेत्यांच्या भेटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली.

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर उदयनराजे भोसले सध्या राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राज ठाकरे यांची भेट देखील मराठा आरक्षणाच्या मुद्दावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सायंकाळी ५ वाजता उदयनराजेंनी राज यांची भेट घेतली. उदयनराजे यांची कृष्णकुंजवरील ही पहिलीच भेट होती. त्यात आज मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे ही भेट विशेष मानली जात आहे.

याआधी उदयनराजे यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र या भेटी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर होत्या, हे स्पष्ट झालं होतं. राज ठाकरे यांची भेट देखील याच मुद्दावर असण्याची शक्यता आहे. मात्र याविषयी ठोस माहिती मिळालेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.