तुकोबांच्या चरणी छत्रपतींनी टेकला माथा

उरुळीकांचन येथे खासदार संभाजीराजेंनी घेतले दर्शन

उरुळी कांचन – लोणी काळभोर येथील मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज यांची पालखी यवतकडे मार्गस्थ होत असताना उरुळी कांचन येथील चौधरी वस्तीवर पालखीचे स्वागत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर ते वारकऱ्यांमध्ये मिसळले. पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा वारकऱ्यांबरोबर चालण्याचा आनंद मोठा आहे. वारकऱ्यांबरोबर चालताना केवळ वारीच समजत नाही तर त्यांच्या अडीअडचणी, दु:खही समजते. यामुळेच पालखीत ठिकठिकाणांहून सहभागी होणार असल्याचेही खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

लोणीकाळभोर येथून संत तुकोबांच्या पालखीने पुढील प्रवासासाठी सकाळी लवकरच प्रस्थान ठेवले. आज एकादशी असल्याने दीड ते दोन तास अगोदारच पालखी आल्याने भाविकांची धावपळ उडाली. थेऊर फाटा विविध मान्यवरांनी केले. यावेळी वरूणराजानेही पालखीचे स्वागत केले. नायगाव फाटा येथे माजी सरपंच पुनम चौधरी, नायगावचे उपसरपंच राजेंद्र चौधरी, सरपंच सागर चौधरी, तंटामुक समितीचे अध्यक्ष मोहन चौधरी यांच्यासह मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.

सोरतापवाडी येथे वारकऱ्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने रेनकोट, बिस्कीट, गुडदाणी पाकीट वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच भारती चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, राजेंद्र चौधरी, अनिल लाड, गणेश चौधरी, आप्पासाहेब लोणकर, सोनबा कड, अजिंक्‍य चौधरी, बाबासाहेब चोरगे आदी उपस्थित होते. कोरेगाव मुळ येथे सरपंच कविता काकडे, उपसरपंच नारायण शिंदे, प्रमोद बोधे, विजय कानकाटे, बापूसाहेब शितोळे, आप्पासाहेब कानकाटे, मुकिंदा काकडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.