…अन छत्रपती संभाजीराजे यांनी लुटला पोहण्याचा आनंद

कोल्हापूर – कोल्हापूरचे राजे अशी ओळख जगभर असणाऱ्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पोहण्याचा मोह आवरला नाही असंच काहीसं घडलं. कोल्हापूर जिल्यातील चंदगड तालुक्यामध्ये धलगरवाडी येथे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गेल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पोहण्याचा आनंद घेतला.

छत्रपती संभाजीराजे हे प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ते काल चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. दुपारी धनगरवाडी रस्त्याकडेला असलेल्या नदीत त्यांना पोहणारी मुले दिसली. यावेळी संभाजीराजेंनी कोणताही विचार न करता गाडी थांबवली आणि पोहणाऱ्या मुलांची गंमत पाहत राहिले. त्यानंतर संभाजीराजेंनाही पोहण्याचा मोह आवरला नाही, क्षणातच त्यांनीदेखील नदीत उडी मारली.

राजांच्या सोबत असलेल्या कोणालाही समजायच्या आत संभाजीराजे सराईतपणे पोहू लागले आणि सर्वजण पाहतच राहिले. तलावातील पोहणारी मुले सुद्धा यावेळी आश्चर्याने स्तब्ध झाली. मात्र संभाजीराजे यांनी आपले राजेपण विसरून त्यांच्यातलेच एक होऊन मस्तपैकी नदीत पोहण्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.