छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय!; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक 

पुणे: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजप नेत्यांनी महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय आहेत. भाजपाच्या अंधभक्तांनी असे पुस्तक छापण्याची अक्षम्य चूक केली असताना आपली तुलना महाराजांशी होऊच शकत नाही, याची समज मोदींना तरी असायला हवी. ही म्हणजे मोदींची सत्तेची गुर्मी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी स्वतः पुस्तकाची माघार जाहीर करावी आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी, अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सडकून टीका केली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श घेऊन नवीन पिढी महाराष्ट्रात आणि देशात सातत्याने काम करत असते. मात्र, केंद्रात असणाऱ्या भाजपा सरकारमधील एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केलाच पण मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या या कृतीचा जाहीर निषेध नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.