महालक्ष्मी एक्सप्रेस चा वेग वाढवा- छत्रपती संभाजी राजे यांची मागणी

काही दिवसांमध्येच अंमलबजावणी केली जाईल: पीयूष गोयल

कोल्हापूर – कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस चा वेग वाढवावा अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे यासंदर्भातील सविस्तर निवेदन आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिल. यावेळी काही दिवसांमध्येच आपण महालक्ष्मी एक्सप्रेस वेग वाढवून असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले

महालक्ष्मी एक्सप्रेस या ट्रेन मुळे कोल्हापूर सहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला गेला आहे. परंतु आज गाडीचा प्रवास खूपच वेळ खाऊ आहे. 518 किलोमीटर चे अंतर कापण्यासाठी 11 तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ 47 किलोमीटर प्रतितास आहे. जो की व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी 60 किलोमीटर प्रतितास करावा जेणेकरून जवळपास दोन ते सव्वादोन तासांची बचत होईल.याचा कोल्हापूर तसेच सर्वच ठिकाणच्या प्रवाश्यांना लाभ होईल. तसेच आज  या स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातमीची दखल घेउन आपुऱ्या राहीलेल्या कामाकडे संभाजीराजेंनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.

कोल्हापूर ते पुणे फास्ट ट्रेन शताब्दी एक्सप्रेस ची राजेंनी पूर्वी केलेल्या मागणीचा पाठपुरावा देखील केला. एकंदरीत रेल्वे संदर्भातील जवळपास सर्वच प्रश्नांचा पाठपुरावा सुरु केला. नवीन सरकार चा कामाचा आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी संभाजीराजेंनी मागण्यांचा धडाका लावला यावर रेल्वे मंत्री श्री पीयूष गोयल यांनी सकारात्मकता दाखवत अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले. कोल्हापूर आणि परिसरातील रेल्वेसंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर माझे मंत्रालय सकारत्मक असेल अशी ग्वाही त्यांनी संभाजीराजेंना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.