मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . याच मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोठी घोषणा केली. मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचं नाव देण्यात येणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. यानंतर शिव शंभू भक्तांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक ट्विट देखील केले आहे. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात,”मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार ! 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”
फडणवीस पुढे म्हणतात,”या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे.”
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले
मुंबईत कोस्टल रोड होणार आहे. या रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार आहे. तसेच याच रोडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा उभारण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी काल केली.