पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची उंची 140 फूट एवढी असेल. शहराच्या तमाम तरुणांना प्रेरणा देणारे ते शिल्प ठरेल, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजंली मंचच्या वतीने संयोजिका पूजा लांडगे यांनी भोसरी येथे आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीचे उद्घाटन गुरुवारी (दि. 30) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते.
संपूर्ण देशाचे आराध्य, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. pic.twitter.com/fuUXDYSD6r
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 30, 2020
छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणांमध्ये एक वेगळी उर्जा येते. या शिल्पाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही यावे अशी आमची अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.