छठ पूजा : यमुना नदीच्या प्रदूषणाचे भयानक रूप समोर 

नवी दिल्ली – छठपूजा हे एक महापर्व असून उत्तर भारतीय बांधवांचा मोठा सण आहे. छठ महापूजेनिमित्त दिल्लीतील यमुना नदीत भाविकांनी उगवत्या सूर्याची पूजा केली. कालिंदी कुंज येथील यमुना नदीत छठ पूजेच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. परंतु, यावेळी नदीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक फेस असल्याने भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

दरम्यान, छठपूजा हे व्रत मनुष्यास निसर्गाच्या सान्निध्यात नेणारे आणि जल, सूर्य, कृषी यांचे महत्त्व पटवून देणारे आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नदी स्वच्छता केली जाते. हा एक हिंदू सण असून छठ मातेच्या पूजेची सुरूवात चतुर्थीला नहाय खायने होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी खराना ऊस, रस, गुळ, खीर, पुरी प्रसाद म्हणून देतात. षष्टीला संध्याकाळी सूर्यास्ता वेळी सूर्याला अर्ध्य वाहतात. सकाळी दूध, जल अर्पण केले जाते. सूर्याच्या उपासनेसाठी हा पर्व साजरा केला जातो. नद्या व सूर्य आपल्याला जीवन देतात. नद्यांबद्दल कृतज्ञ आहोत हे या छठ पूजेतून दाखवले जाते. यादिवशी नद्यांची स्वच्छता केली जाते. परंतु, यमुना नदी मोठ्या प्रमाणावर प्रदुषित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.