अलीगढमध्ये छपाक प्रदर्शन धमक्‍या देऊन केले रद्द

अलीगढ : हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याने अलीगढमध्ये छपाक चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर थिएटरचा विमा उतरवा अशा शब्दात चित्रपटगृह मालकांना भित्तीपत्रकाद्वारे धमकावण्यात आले. त्यामुळे अलीगढमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना सहानुभुती दाखवण्यासाठी दीपिका पादुकोण तेथे गेली होती.

या धमकीच्या फलकावर पंकज पंडित आणि दीपक शर्मा या अखंड भारत हिंदु सेनेच्या नेत्यांची नावे आणि छायाचित्रे आहेत. या भित्तिपत्रकात दीपिकाने राष्ट्रीयत्वावर ऍसिड फेकले असे म्हटले आहे.

ऍसीड हल्ल्यात बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारला आहे. अलीगढमध्ये किमान दोन चित्रपटगृहात छपाक प्रदर्शित होणार होता त्याऐवजी तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा चित्रपट लावण्यात आला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.