दिग्विजय सिहांच्या प्रचारार्थ छगन भुजबळांची उद्या भोपाळमध्ये सभा

नाशिक – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे दिग्विजय सिंग यांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पक्षाच्या तिकिटावर भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात भाजपतर्फे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी देत निवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपतर्फे देखील हिंदुत्ववादी चेहरा देण्यात आला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ दिग्विजय सिहांच्या प्रचारार्थ उद्या भोपाळ गाठणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. भुजबळ हे उद्या मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये काही निवडणूक सभांना संबोधित करणार असून त्यानंतर ते एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.