Chhagan Bhujbal : साहेब, निर्णय घ्या..! राज्यसभा डावलल्यानंतर समर्थक आक्रमक; छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार?
Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर राज्यसभा उमेदवारीसाठी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर येवला शहरात भुजबळ समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टरबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे. (Chhagan Bhujbal)
“साहेब, निर्णय घ्या” असा मजकूर असलेले पोस्टर्स शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, अंतिम क्षणी पक्षाने राजेंद्र जैन यांना संधी दिल्याने समर्थकांची निराशा झाली आहे. (Chhagan Bhujbal)
मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्वाने भुजबळ यांना राज्यसभेत पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, भुजबळ यांनी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याची अट मांडल्याची चर्चा आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात आला होता, मात्र त्याला अंतिम मान्यता मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal : साहेब, निर्णय घ्या..! राज्यसभा डावलल्यानंतर समर्थक आक्रमक; छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार?
दरम्यान, राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा होताच भुजबळ समर्थकांमध्ये असंतोष वाढला. अनेक ठिकाणी बॅनर आणि पोस्टर्स लावून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे भुजबळ पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Chhagan Bhujbal)
याबाबत प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी लोकसभा आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीही अनेकदा संधी जवळ येऊनही मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, समर्थकांच्या पोस्टरबाजीनंतर या प्रकरणाला नवे राजकीय परिमाण मिळाले असून आगामी काळात भुजबळांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Chhagan Bhujbal)





