मराठवाडा विरूद्ध नगर, नाशिक संघर्ष कायमचा मिटवणार – छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या धरतीवर जे पावसाचे पाणी पडेल त्यावर महाराष्ट्राचा हक्क

कोपरगाव – घाटमाथ्यासह महाराष्ट्राच्या धरतीवर जिथे जिथे पाऊस पडेल त्या पडलेल्या पाण्यावर संपूर्ण हक्क महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पश्चिमेच्या घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी गुजरात राज्यातून समुद्राला जाऊन मिळते. तेच वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले तर शेकडो टीएमसी पाण्याचा साठा वाढेल. 

वाढीव पाणी सर्वांना मुबलक प्रमाणात मिळेल. भविष्यात मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक सह तालुकास्तरावरील पाण्याचा संघर्ष कायमचा मिटणार आहे. पाणी वळविण्यासाठी जो काही निधी लागेल तो देऊन हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यलायात गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन ना छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला आमदार आशुतोष काळे, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्या अलका आहेरराव, नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, काळे कारखाना व्हाईस चेअरमन रोहोम,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे डॉ अजय गर्जे, संभाजी काळे, विविध संस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी चालु हंगामातील धरणातील पाण्याची उपलब्धता सांगून तीन आवर्तने सोडणार असल्याचे सांगितले. यावेळी भुजबळ बोलताना पुढे म्हणाले की,चालू वर्षीच्या हंगामातील पाऊस धरण परिसरात कमी पडल्याने मुकणे धरणात पाणी साठा कमी आहे .

उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन ,गळती व अन्य कारणाने पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याच्या अवर्तनाचे नियोजन कमी जास्त होऊ शकते .चालू हंगामात रब्बी साठी एक व खरीपासाठी ३असे तीन आवर्तने सोडण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली.उन्हाळ्यात दोन ऐवजी तीन रोटेशन देण्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ .आवर्तन कमी जास्त सोडण्याचा सर्वस्वी अधिकार आमदार आशुतोष काळे यांना देतो.

त्यांनी सांगेल त्या कागदावर मी सही करायला तयार आहे त्यांनी स्वतः पाण्याचे नियोजन करावे असे सुचविले.राज्यात सर्वच विभागात नौकर भरती गरजेची आहे. दरवर्षी तीन टक्के कामगारांची निवृत्ती होते मात्र नौकर भरतीची प्रक्रिया सुरू होताच मोर्चे येतात त्यामुळे पुन्हा भरती थांबते. कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रशासकीय कामे वेळेत होत नाहीत. अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.

सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. करोनामुळे बाजारपेठेतीलआर्थिक उलाढाल मंदावली, केंद्राने जी एस टीचे ३० हजार कोटी अडवून ठेवले त्यामुळे विकासकात अडथळे निर्माण होत आहेत. मागील पाच वर्षात विकास कामे झाली नाहीत तो ही बॅकलॉग या सरकारला भरायचा आहे. असे म्हणत विरोधकावर निषाना साधला.

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले,गोदावरी खोऱ्याच्या लाभक्षेत्रात पाणी प्रश्न बिकट होत असून पश्चिमेचे समुद्राला जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे किती गरजेचे आहे यावर लक्ष केंद्रीत करून मंत्री छगन भुजबळ यांनी यात विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली. आवर्तन सोडण्यापुर्वी पाटबंधारे विभागाने चाऱ्या दुरुस्ती कराव्या. पाणी मिळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर अर्ज भरावे.तसेच उन्हाळ्यात दोन ऐवजी तीन आवर्तन देऊन एकूण चार आवर्तन देण्याची मागणी काळे यांनी पाटबंधारे विभागाला केली.

जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने म्हणाले, समन्यायी पाणी वाटपाचा जाचक कायदा आमच्या माथी मारून आमच्यावर अन्याय झाला आहे. एक तर तो कायदा संपूर्ण राज्याला लागू करावा किंवा रद्द तरी करावी अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे म्हणाले,जेंव्हा जलसंपदा मंत्री म्हणून महादेव शिवरकर होते तेंव्हा गोदावरी कालव्यांना दरमहा आवर्तन दिले जात होते मग आता मुबलक पाऊस पाणी आहे.

शंभर टक्के धरण भरूनही केवळ तीन आवर्तने का दिले जात आहे.रब्बीच्या एक अवर्तनावर शेतकऱ्यांनी पिकाचे कसे नियोजन करावे असा प्रश्न उपस्थित करून पाण्याची चोरी,कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यावर लक्ष वेधले. यावेळी पदमकांत कुदळे, डॉ अजय गर्जे, सचिन शिंदे, कारभारी आगवान, अशोक खांबेकर, एम.टी. रोहमारे यांनी विविध समस्या मांडून मंत्री महोदयासह अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी, पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी,पाटबंधारे विभागाचे संबधीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

गेली पाच वर्ष कालवा सल्लागार समितीची बैठक वातानुकूलित कार्यालयात घेवून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले गेले मात्र प्रथमच आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांसमवेत तालुका स्तरावर घेतल्याने उपस्थित शेतकऱ्यांपैकी अनेकांनी आमदार काळे व मंत्री छगन भुजबळ यांचे विषेश अभिनंदन करून आभार मानले.

मंत्रीमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी केलेल्या मागणीला नासिक जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपला पाठिंबा राहील अशी ग्वाही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्ननागरी, पुरवठा ग्राहक मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांनी कोपरगाव येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.