छाब्रिया म्हणतात…तो गुन्हा केवळ छळ करण्यासाठी

पुणे – फिनोलेक्‍स केबल्स व फिनोलेक्‍स लासन इंडिया या कंपन्यांचे नियंत्रण स्वत:कडे घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी प्रकाश छाब्रिया व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा छळ करण्याच्या हेतूने दाखल केल्याची प्रतिक्रिया प्रकाश छाब्रिया यांच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.

दीपक छाब्रिया यांच्या तक्रारीच्या आधारे पुणे पोलिसांनी “एफआयआर’ नोंदवला आहे. 2016 मध्ये वडिलांच्या निधनानंतर कौटुंबीक वाद सुरू आहेत. दीपक छाब्रिया हे न्यायालयाच्या बऱ्याच सुनावणीमध्ये पराभूत झाले आहेत. मार्च 2020 मध्ये त्यांची फौजदारी तक्रार पीसीएमसी पोलिसांनी फेटाळली होती. त्यानंतर एडीजी होमगार्डमार्फत चौकशीची मागणी केली गेली, जी हायकोर्टामध्ये सुरू आहे.

केवळ छळ करण्याच्या हेतूने “एफआयआर’नोंदविण्यात आला आहे. कायदेशीर व्यवस्थेवर संपूर्ण विश्‍वास आहे. आम्ही त्याच्या हक्कांची बाजू मांडण्याच्या आणि या खोट्या, निराधार व अन्यायकारक खटल्याला सामोरे जाण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या प्रक्रियेत आहोत, अशी बाजू मांडण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.