लंडन – भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याने इंग्लिश काऊंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना डर्बिशायरविरुद्ध अफलातून दीडशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याच्या संघाला दुसऱ्या डावात आघाडी घेता आली.
डर्बीशायरने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव 8 बाद 505 धावांवर घोषित केला. यात शान मसूदने दमदार 239 धावांची खेळी केली. ससेक्सचा पहिला डाव 174 धावात आटोपला. त्यात पुजारा अवघ्या 6 धावांवर बाद झाला होता.
The moment @cheteshwar1 brought up his 1⃣5⃣0⃣. 🌟 pic.twitter.com/nzJgp9A30S
— Sussex Cricket (@SussexCCC) April 17, 2022
ही कसर त्याने दुसरा डाव सुरु झाल्यावर काढली व अफलातून दीडशतक साकार केले. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 51 वे शतक ठरले. आता तो या स्पर्धेत आणखी पुढील सामव्यांत कशी फलंदाजी करतो यावरच त्याचे भारताच्या कसोटी संघातील पुनरागमन अवलंबून राहणार आहे.