हडपसर : कोंढव्यातील मुस्लिम समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन तुपेंना पाठिंबा दर्शवला. समाज बांधवांनी ठिकठिकाणी चेतन तुपे यांचा भव्य सत्कार केला व विजयासाठी पाठिंबा जाहीर केला. प्रत्येक गल्ली व चौकात मुस्लिम बांधवांनी रॅलीचे भव्य स्वागत केले. कोंढव्यातील या प्रचार रॅलीत ज्येष्ठ, महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा होता. मुस्लिम समाज बांधवांन बरोबरच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेतन तुपे यांच्या रॅलीचे स्वागत केले आम्हीही सोबत असल्याची ग्वाही दिली.
महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात कोंढवा खुर्द येथे आज ठिकठिकाणी पदयात्रा आणि बाईक रॅली द्वारे या जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक गफूर पठाण, माजी नगरसेवक रईस सुंडके,माजी नगरसेविका परवीन हाजी फिरोज, हाजी फिरोज शेख,स्वीकृत नगरसेविका हसीना इनामदार,माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, अन्वर मेमन,आबिद सय्यद,जावेद शेख,अब्दुल बागवान,नजीर मामु,इब्राहिम चाचा,सरवर शेख,ज्योती पाटील हे उपस्थित होते.
तसेच वैशाली हांडे ,मुनाफ शेख,बाबा शेख,आलिम शेख,अन्वर शेख,बाप्पु मुलाणी,राजु आडागळे, इम्तियाज शेख,जावेद पठाण,अजर पठाण,एजाज शेख, ईस्माईल आगवान,मजहर काश्मिरी,सुफियान शेख,जाबिर शेख,ईस्माईल शेख,शाकीर शेख,इरफान शेख,राजु सय्यद,सादिक पानसरे,युनुस खान,लियाकत शेख,रिजवान शेख,सलमान पठाण, अमजद पठाण, सलमान काझी,जाकीर शेख,मुज्जु शेख ,राहिल सय्यद, अजीज खान,फैसल शेख,समीर बागवान,अल्ताफ सय्यद, कलीम शेख,लड्डु शेख,जुबेर शेख,आवेज शेख,अरबाज शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
चेतन तुपे म्हणाले की मतदारसंघातील माझी जनता मला त्यांच्या हक्काचा माणूस म्हणून ओळखते. इथल्या नागरिकांच्या प्रत्येक सुख दुःखात सदैव त्यांच्या साथीला असल्याने प्रत्येक कुटुंबीय मला त्यांच्या घरातला एक सदस्य समजतात याची मला जाणीव आहे.अगदी त्याच हक्काने मी माझ्या माणसांकडे क्रमांक १ चे घड्याळ चिन्हाच्या समोरचे बटन दाबून विजयी करा आणि हडपसरचा विकास अधिक गतिमान करा, असे आवाहन केले आहे.