हडपसर – देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासावर विश्वास ठेवत आहे. महाराष्ट्र राज्यातही सर्वाधिक जागांवर भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार विजयी होतील. कारण कॉंग्रेस फक्त खोटे बोलण्याचे काम करीत आहे. हे लोकांच्या चांगलेच लक्षात आले आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर सर्वांचा विश्वास आहे. कारण, पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करतात. त्यांना ताकद देण्यासाठी आपण चेतन तुपे यांना विजयी करावे, असे आवाहन हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री नायब सिह सैनी यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ भाजप आयोजित मेळाव्यात नायब सिंह सेनी बोलत होते. यावेळी आमदार योगेश टिळेकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, ओबीसी मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, सरचिटणीस सुभाष जंगले, संदीप दळवी, अनिल येवले, सुनिल बनकर, भूषण तुपे, जीवन जाधव, संदीप लोणकर, गणेश घुले, शिवराज घुले, आण्णा धारवाडकर, बाळासाहेब घुले आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, संत सावता क्रांती परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात समविचाराचे सरकार राहिल्याने विकासकामे वेगाने होतात. त्यामुळे हडपसर धून चेतन तुपे यांना विजयी करावे. आमदार योगेश टिळेकर आणि मी स्वतः आपल्याला पुढील पाच वर्ष चांगला विकास करून दाखवू, असा विश्वास महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी व्यक्त केला.