Chetan Patil arrested । सिंधुदुर्गमधील पुतळ्यावरून राज्यात सध्या वातावरण चांगलेच तापले आहे . आता या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अखेर या प्रकरणी कारवाई करतात कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस जयदीप आपटेच्या शोधात Chetan Patil arrested ।
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटेदेखील सध्या फरार आहे. जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले होते, त्यावेळी त्याच्या घराला टाळे होते. यानंतर पोलिसांनी माहेरी गेलेल्या जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशी केली.
चेतन पाटील याला आता मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट असून त्याच्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता, त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन देण्यात आले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याचे चेतन पाटील याने अगोदरच स्पष्ट केले होते.
चेतन पाटीलनं फेटाळलेले आरोप Chetan Patil arrested ।
दरम्यान, चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेले. मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करणारा ठाण्यातील जयदीप आपटे या तरुणाचा शोध सुरू होता. सध्या तो फरार झाला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.