बुद्धिबळातील आनंदावर पराभवांचे विरजण

चेन्नई –भारताचा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद याला लिजंड्‌स बुद्धिबळ स्पर्धेत सलग चौथा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत आनंदवर नेदरलॅंडच्या अनीश गिरी याने 3-2 अशी मात केली. या पराभवांमुळे आनंदच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील वर्चस्वालाच धक्‍का बसला आहे. 

शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात रशियाचा अव्वल खेळाडू व्लादीमिर क्रामनिक याने आनंदवर 2.5-0.5 अशी सहज मात केली. त्यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या फेरीतही आनंदला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या फेरीत आनंदला रशियाच्या पीटर स्विडलरने 2.5-1.5 असे हरवले होते. त्यानंतर जागतिक अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन याने 2.5-1.5 याच फरकाने पराभूत केले.

जागतिक बुद्धिबळ क्षेत्रावर सातत्याने रशियाच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. याच वर्चस्वाला आनंदने आव्हान देत आपला दबदबा निर्माण केला. यंदाच्या मोसमातील पहिल्या स्पर्धेत आनंदने सरस कामगिरी केली होती.

करोनामुळे या स्पर्धा ऑनलाइन घेतल्या जात असून आनंदला आपल्या दर्जाला साजेसा खेळ करता येत नसल्याने सलग चौथा पराभवाचा त्याला सामना करावा लागला आहे. भारतात आनंदने बुद्धिबळ संस्कृती रुजवली. तो जेव्हा ग्रॅण्डमास्टर बनला तेव्हापासून त्याच्याकडून आदर्श घेत लाखो मुले या
खेळाकडे वळली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.