चेन्नई – युवा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू डी. गुकेशच्या कामगिरीच्या जोरावर भारताच्या ‘ब’ संघाने येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आठव्या फेरीअखेर अमेरिकेचा 3-1 असा पराभव करत वर्चस्व राखले.
भारत ‘ब’ संघाकडून गुकेशने अमेरिकेच्या फॅबिआनो कारूआनाचा पराभव केला, तर रौनक साधवानीने लिनिएर डोमिगेजवर मात केली. निहाल सरिन व आर. प्रज्ञानंद यांनी अनुक्रमे लेव्हॉन अरोनियन आणि वेस्ली सो यांच्याशी बरोबरी साधली व संघाच्या विजयात मोठी भूमिका साकारली.
भारताच्या अ संघाला मात्र अर्मेनियाकडून पराभव स्वीकारावा लागला. पी. हरिकृष्णाला गॅब्रिएल सर्गिसियनने पराभूत केले, तर विदित गुजराथी, अर्जुन इरिगेसी व एसएल नारायणन यांचे सामने बरोबरीत सुटले. भारताच्या क संघाला पेरूकडून 3-1 अशी हार पत्करावी लागली.