बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटे विजेता

कोल्हापूर – अग्रमानांकित कोल्हापूरचा सम्मेद शेटेने आठपैकी साडेसात गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे चंद्रकांत दादा चषक खुल्या एक दिवशीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले.त्याला रोख पाच हजार व चषक देऊन गौरविण्यात आले पाचव्या मानांकित रेंदाळच्या श्रीराज भोसलेने सात गुणासह उपविजेतेपद संपादिले त्याला रोख तीन हजार व चषक देऊन गौरविले तर आठवा मानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने सात गुणासह तृतीय स्थानी झेप घेवून रोख दोन हजार व चषक मिळविले.

अडतीसावा मानांकित कोल्हापूरच्या सोहम चाळके सर्वांचे लक्ष वेधत सात गुणांसह चौथ्या स्थानावर मुसंडी मारली व रोख रुपये दीड हजार हस्तगत केले तर द्वितीय मानांकित मिरजेच्या मुदस्सर पटेलला साडेसहा गुणासह पाचव्या स्थानावर एक हजार रुपये घेऊन समाधान मानावे लागले.

बक्षीस समारंभ दिग्विजय खानविलकर फाऊंडेशनच्या श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर व विश्वविजय खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर सुमित्रा खानविलकर प्राध्यापक अरुण मराठे कोल्हापूर स्पोर्टस क्‍लबचे चेतन चव्हाण व डॉ. विजय कुलकर्णी,भरत चौगुले,उत्कर्ष लोमटे,वीरविजय खानविलकर, प्रीतम घोडके,मनीष मारूलकर,स्मिता सावंत, सिद्धीविजय खानविलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धा कोल्हापूर चेस अकॅडमीच्या वतीने व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन नागाळा पार्क येथे झाल्या.

सहा ते एकवीस क्रमांकाचे बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे –

माधव देवस्थळे कोल्हापूर सोहम खासबारदार कोल्हापूर सारंग पाटील कोल्हापूर प्रवीण सावर्डेकर चीपळून अभिषेक पाटील सांगली सदानंद चोथे सांगली शबान शेख कोल्हापूर शर्विल पाटील कोल्हापूर प्रणव पाटील कोल्हापूर तुषार शर्मा कोल्हापूर अथर्व चव्हाण कोल्हापूर यश घोरपडे कोल्हापूर यश आवटे विटा श्रीधर तावडे कोल्हापूर सुरज वैद्य कोल्हापूर व निहाल मुल्ला कागल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)