मुंबई -संमिश्र कामगिरी करत असलेल्या राजस्थान रॉयल्सशी आज चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला होणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला गतवर्षीच्या स्पर्धेसह यंदाच्या स्पर्धेतही अद्यापपर्यंत फारशी सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
चेन्नईबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून आता खरोखर सरस कामगिरीसह धूर्त नेतृत्वाचीही अपेक्षा आहे. जेव्हापासून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आजवर त्याला त्याच्या पूर्वीच्या कामगिरीशी बरोबरी करता आलेली नाही. गतवर्षी त्याच्या संघाला बाद फेरीही गाठता आली नाही.
राजस्थानच्या संघाला यंदा नवीन कर्णधार मिळाला असला तरीही त्यांच्या अपयशी कामगिरीत खंड पडलेला नाही. कर्णधार संजू सॅमसन वैयक्तीक कामगिरी सरस करत असला तरीही सांघिक स्तरावर त्याला फारसे यश हाती लागलेले नाही. स्टिव्ह स्मिथलाही म्हणावी तशी संधी अद्याप मिळालेली नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना त्यांनी जिंकला असला तरीही त्यांना या स्पर्धेत बाद फेरी गाठायची असेल तर सातत्याने विजय मिळवले पाहिजेत.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30.
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर
मॉरिसच ट्रम्पकार्ड ठरेल
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा पराभव स्पष्ट दिसत असताना यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत हा सामना जिंकून दिला. आता पुढील सामन्यांमध्येही त्याचीच कामगिरी निर्णायक ठरणार आहे.