चेन्नई सुपर किंग्जने टाॅस जिंकला

दुबई – महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ यांच्यात आज होत असलेला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघात नवोदित खेळाडूंचा भरणा असल्याने दोन्ही संघांना संघबांधणी व सेकंड बेंचची गुणवत्ता पारखण्याची संधी आहे.

चेन्नई विरूध्द दिल्ली या सामन्यास काही वेळातच सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा चेन्नईच्या बाजूने लागला आहे. चेन्नईचा कर्णधार एम.एस.धोनी याने क्षेत्ररक्षण स्विकारताना दिल्ली संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नईने सुरुवात चांगली केली होती. मात्र, नंतरच्या सामन्यात त्यांना राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, दुसरीकडे दिल्ली संघाचा पहिल्या सामन्यात पराभव जवळपास निश्‍चित होता. मात्र, हा सामना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने टाय झाला व सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.